सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात श्री गणरायाची महाआरती; आरोग्य शिबिराचे नगरसेविका भक्ती गायकवाड यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : गणेशोत्सवाच्या निमित्त सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेवक हनुमान मंडळाला सदिच्छा भेट देत नगरसेविका सौ. भक्ती अजीत गायकवाड यांनी श्री गणरायाचे भावपूर्ण दर्शन घेऊन महाआरती केली. यावेळी मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला विद्यापीठातील सेवक बंधू-भगिनी, मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी समाजोपयोगी कार्य करणाऱ्या दिव्यांग संस्थांच्या प्रतिनिधींचा सत्कारही करण्यात आला.

दिव्यांगांसाठी तसेच समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक बांधिलकीतून कार्य करणाऱ्या संस्थांचा सन्मान करण्याची संधी मिळाल्याबद्दल गायकवाड यांनी आनंद व्यक्त केला. विद्यापीठातील सेवक वर्गाची श्री गणरायावरील श्रद्धा आणि सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

See also  केंद्राचा गॅस पाइपलाइन निर्णय; PNG ला चालना, पण कंपन्यांच्या मनमानीची भीती