वाहन चालवताना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या- शंकर भोसले

पुणे : वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून अपघात टाळण्यासाठी वाहतूक नियमांचे पालन करून स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेची काळजी घ्या, असे आवाहन भिगवण पोलीस ठाण्याचे शंकर भोसले यांनी स्वामी विवेकानंद असोसिएशन यांच्या इंदापूर तालुक्यातील मदनवाडी चौकातील गणेश मंडळासमोर आयोजित लोकसंवाद कार्यक्रमात केले.

श्री. भोसले यांनी शाळा व दवाखान्यांच्या परिसरात वेगमर्यादा पाळावी,वाहन नेहमी सुरक्षित व नियंत्रित वेगाने चालवावे, वाहतूक सिग्नल व चिन्हांचे पालन करावे,वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर करावा.नो-पार्किंग झोनमध्ये वाहने पार्क करू नयेत.

पादचारी मार्ग व झेब्रा क्रॉसिंगवर वाहने थांबवू नयेत, मद्यपान करून वाहन चालवू नये, पुढील वाहनापासून योग्य अंतर ठेवावे.रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन वाहनांना मार्ग द्यावा, अशा सूचनाही नागरिकांना दिल्या.

यावेळी पोलीस पुणे ग्रामीण वाहतूक विभागाचे गणेश सोनबा करचे यांनी वाहतूक नियमांचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.

See also  विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा तपासणीसाठी मंत्री, अधिकाऱ्यांनी वसतिगृह, शाळांना अचानक भेटी द्याव्यात – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे