जे.एस.पी.एम.च्या भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक महाविद्यालयात रक्तदान शिबिर उत्स्फूर्त प्रतिसाद

वाघोली : वाघोली येथील जे.एस.पी.एम.च्या भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एन.एस.एस.) विभागाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिराचे आयोजन पुणे ब्लड बँकेच्या सहकार्याने करण्यात आले. यावेळी वाघोली संकुलाचे संचालक डॉ.व्ही.ए.बुगडे, सहाय्यक संचालक प्रा.एस.के.वाकचौरे, प्राचार्य डॉ.पी. टी.काळे, उपप्राचार्य डॉ.एम.एस.यादव, डीन डॉ.व्ही.एस.दाभाडे आणि प्रा.एस.जी.जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमाला सर्व विभागप्रमुख, प्राध्यापकवर्ग तसेच विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. समाजसेवा आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून प्रेरित होऊन ५५१ हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले. हे रक्तदान शिबिर उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडले.

See also  भाजपा वर्धापनदिनानिमित्त सेवा सप्ताहात विविध संस्थांना साहित्य वाटप