भव्य मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे सहकार्याने
लायन्स क्लब ऑफ पुणे कात्रज, माय माऊली केअर सेंटर पुणे एच व्ही देसाई हॉस्पिटल महंमदवाडी पुणे ससून नेत्र रुग्णालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, मोफत मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रिया असे भव्य आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.

भावे हायस्कूल सदाशिव पेठ पुणे येथे येथे 900 विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी व जनरल चेकअप व मोफत औषधी वाटप केले 900 विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. इतरही आरोग्य तपासण्या ट्रस्टच्या माध्यमातून ठेवण्यात आल्या होत्या त्या सर्व तपासण्यांचा विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.


या कार्यक्रमाला उपस्थित श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाचे सर्व अधिकारी आणि संस्थापक अध्यक्ष माय माऊली केअर सेंटर पुणे लायन्स क्लब पुणे कात्रज व डिस्टिक चेअर पर्सन मोतीबिंदू व लेन्स शस्त्रक्रिया ला. विठ्ठलराव वरुडे पाटील अध्यक्ष ला. भानुदास पायगुडे भावे हायस्कूल शाळेतील मुख्याध्यापिका शिक्षक वर्ग सेवक वर्ग यावेळी उपस्थित होते.

See also  निर्मलवारीसाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा सज्ज