पुणे : पाषाण येथील चिंचेची आळी, पेठ जिजापूर परिसरातील सोमेश्वर मित्र मंडळ ट्रस्टच्या वतीने यंदा गणेशोत्सवानिमित्त श्री राम मंदिराचा आकर्षक विद्युत रोषणाईचा देखावा साकारण्यात आला आहे. मंडळाच्या ६२व्या वर्षानिमित्त साकारण्यात आलेला हा देखावा भाविक व नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
श्री राम मंदिराची प्रतिकृती आणि आकर्षक एलईडी रोषणाईच्या माध्यमातून देखावा सादर करण्यात आला असून, गणेशोत्सवाच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिक तसेच गणेशभक्त मोठ्या संख्येने भेट देत आहेत.
सोमेश्वर मित्र मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अजय भगवान निम्हण असून उपाध्यक्षपदाची जबाबदारी गणेश वेल्हाळ सांभाळत आहेत. मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागातून हा देखावा साकारण्यात आला आहे.
















