निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करून मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून हटवावे : पृथ्वीराज चव्हाण

मुंबई : निवडणूक आयोगाच्या (ECI) कामकाजाबाबत ‘द इंडियन एक्सप्रेस’ दैनिकाने प्रसिद्ध केलेला अहवाल धक्कादायक असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटविण्याची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील आपल्या पोस्टमध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोग ही संविधानाच्या कलम ३२४ अन्वये स्थापन झालेली घटनात्मक संस्था असून १९९५ मधील ‘टी.एन. शेषन विरुद्ध भारत सरकार’ या ऐतिहासिक खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये निवडणूक आयुक्तांचे अधिकार आणि भूमिका स्पष्टपणे निश्चित करण्यात आल्या आहेत.

‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्ताचा हवाला देत त्यांनी आरोप केला की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा न करताच आयोगाच्या वतीने निर्णय घेत होते. या संदर्भातील बाबींची सविस्तर नोंद संबंधित वृत्तात असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या वृत्ताचे अद्याप कोणाकडूनही खंडन करण्यात आले नसल्याचा दावाही त्यांनी केला.मुख्य निवडणूक आयुक्तांकडून अधिकाराचा उघड गैरवापर झाल्याचा आरोप करत चव्हाण यांनी, “ते कोणाला निवडणुका जिंकण्यास मदत करत होते?” असा सवाल उपस्थित केला. गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारवर झालेला हा सर्वात गंभीर आरोप असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाने दिलेले “आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतले” हे स्पष्टीकरण तपासाअंती टिकत नसल्याचा दावा करत, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर दोन सदस्यांपैकी कोणी तरी सत्य सांगत नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. मतभेद असू शकतात; मात्र कायद्यानुसार निर्णय एकमताने किंवा बहुमताने सामूहिकरीत्या घेतले जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या प्रकरणी काँग्रेस पक्षाने ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलवावी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची मागणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

See also  महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाचे थाटात उद्घाटन

मुख्य निवडणूक आयुक्तांकडून अधिकाराचा उघड गैरवापर झाल्याचा आरोप करत चव्हाण यांनी, “ते कोणाला निवडणुका जिंकण्यास मदत करत होते?” असा सवाल उपस्थित केला. गेल्या १२ वर्षांत मोदी सरकारवर झालेला हा सर्वात गंभीर आरोप असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने दिलेले “आम्ही एकत्रितपणे निर्णय घेतले” हे स्पष्टीकरण तपासाअंती टिकत नसल्याचा दावा करत, मुख्य निवडणूक आयुक्त किंवा इतर दोन सदस्यांपैकी कोणी तरी सत्य सांगत नसल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे. मतभेद असू शकतात; मात्र कायद्यानुसार निर्णय एकमताने किंवा बहुमताने सामूहिकरीत्या घेतले जाणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.या प्रकरणी काँग्रेस पक्षाने ‘इंडिया’ (INDIA) आघाडीच्या नेत्यांची तातडीने बैठक बोलवावी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्याची मागणी करावी, असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच आवश्यक असल्यास सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेऊन निवडणूक आयोगाच्या कामकाजाची चौकशी करावी. राज्यघटनेत नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार मुख्य निवडणूक आयुक्तांना पदावरून दूर करण्यासाठी विरोधी पक्षाने महाभियोगाचा प्रस्ताव मांडावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
“हा विषय अत्यंत गंभीर आहे. निवडणुका मॅनेज केल्या तर लोकशाहीला काही अर्थच नाही,” असे नमूद करत पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.