बालेवाडी : बालेवाडी येथील साई मित्र मंडळाने गणेशोत्सवानिमित्त कै. तेजस बालवडकर यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरामध्ये 143 रक्तदात्यांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.
माजी नगरसेवक अमोल बालवडकर,गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर , सचिन पाषाणकर, लहु बालवडकर, राहुल बालवडकर, मनोज बालवडकर मंडळाचे अध्यक्ष शिवम बालवडकर आदी उपस्थित होते.
या रक्तदान शिबिराचे आयोजन शिवम बालवडकर अध्यक्ष भाजपा युवा वॅारियर्स पुणे शहर यांनी केले. ज्युपिटर हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या डॉक्टर व कर्मचारी यांच्या वतीने रक्त संकलन करण्यात आले.