विराज पाटोलेच्या कुटुंबीयांची सुप्रिया सुळे यांनी घेतली सांत्वनपर भेट; जयेश मुरकुटे फाउंडेशनकडून एक लाखांची मदत

माण  : रस्ता अपघातात ११ वर्षीय विराज पाटोले याचे दुर्दैवी निधन झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी काल माण येथील पाटोले-कुंबे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. या दुःखद प्रसंगी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांचे सांत्वन केले.

विराजच्या अकाली निधनाने पाटोले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या कठीण प्रसंगी कुटुंबीयांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी जयेश मुरकुटे फाउंडेशनच्या माध्यमातून पाटोले कुटुंबीयांना १ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

यावेळी जयेश मुरकुटे, महादेव कोंढरे, दगडूकाका करंजवणे, निलेश पाडळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

विराजच्या निधनाने पाटोले कुटुंबीयांवर आलेल्या दुःखात सहभागी होत, त्यांच्या या कठीण प्रसंगी मदतीचा हात देण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे जयेश संजय मुरकुटे यांनी सांगितले.

See also  औंध येथील विनापरवाना रस्ता खोदाई करून विद्युत केबल टाकणाऱ्यांना तीन पट दंडाची कारवाई 41लाखांचा दंड