महात्मा गांधी जयंतीनिमित्त मुळशी तालुक्यात स्वछता अभियान

पौड : महात्मा गांधी जयंतीनिमित्त मुळशी तालुक्यात पंचायत समिती व शेतकरी संघाच्यावतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी आपला मुळशी स्वछ मुळशी उपक्रम गावोगावी राबविण्यात आला.

पौड येथे पंचायत समिती, बस स्थानक, तहसील कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आले. ग्रामस्थांना स्वच्छतेचे आवाहन करण्यात आले. तसेच घोटावडे, भूगाव, भुकूम, पिरंगुट गावातून स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. तालुक्यातील प्रत्येक गणातून एक गाव निवडण्यात येणार असून आदर्श स्वच्छता ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याचे  सभापती मंदा शेळके यांनी सांगितले.

यावेळी उपसभापती दगडूकाका करंजावणे, सदस्य प्रविण धनवे, राहूल पवळे, काजल मोरे, एश्वर्या वाघमारे, शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र मारणे, राम गायकवाड, भाऊ केदारी, आप्पा ढमाले, महादेव मरगळे, संतोष साठे, जयराम दिघे, दत्तात्रय मारणे, दत्तात्रय तुपे उपस्थित होते.

See also  भाजपा शहर उपाध्यक्ष राहुल कोकाटे यांच्या वतीने सुसगाव ते पाषाण नागरिकांसाठी मोफत वाहन प्रवास योजनेचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शुभारंभ