बाणेर मधील सुलोचना विलास शिंदे यांचे निधन

पुणे : बाणेर येथील कै. श्रीमती सुलोचना विलास शिंदे यांचे बुधवार, दि. १४ ऑक्टोबर २०२६ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिंदे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. बाणेर मधील धार्मिक सामाजिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग होता.

कै. सुलोचना शिंदे यांच्या पार्थिवावर बुधवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता बाणेर स्मशानभूमी येथे अंत्यविधी करण्यात येणार आहेत.

त्यांच्या पश्चात मुले प्रविण विलास शिंदे, दीपक विलास शिंदे, सागर विलास शिंदे आणि संदीप विलास शिंदे, सुना,नातवंडे असा परिवार आहे.

See also  बाणेर नागरी सहकारी पतसंस्थेचा 26 वा वर्धापन दिन मोठया उत्साहात संपन्न