पुणे जिल्ह्यातील युरिया व डीएपी खताचा संरक्षित साठा मुक्त

पुणे : पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात शेतकऱ्यांना खताची टंचाई भासू नये याकरिता युरिया खताचा २७२२.६५० व डीएपी खताचा ९१२.२०० मे. टन संरक्षित साठा करण्यात आला आहे. संरक्षित साठ्या मधून १०० टक्के डीएपी व ५० टक्के युरिया जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने वितरित करण्यास मान्यता मिळाली आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील तालुका निहाय मुक्त केलेला संक्षित साठा (मे.टन मध्ये): आंबेगाव – युरीया ११६.१०० मे. टन, डी.ए.पी. ५०.२०० मे. टन, मुळशी – युरीया ५४.९००, डी.ए.पी. ३०, जुन्नर – युरीया १०१.२५०, डी.ए.पी. ८५, मावळ- युरीया १६२.९००, डी.ए.पी. ५५, खेड – युरीया ११४.०७५, डी.ए.पी. ७८, शिरुर- युरीया १२५.७७५, डी.ए.पी. १००, दौंड – युरीया १६४.४७५, डी.ए.पी. १०१, पुरंदर – युरीया ७४.७००, डी.ए.पी. ५३, हवेली युरीया ३९.६००, डी.ए.पी. २०, भोर- युरीया ७५, डी.ए.पी. ४९, वेल्हा- युरीया ४०.९५०, डी.ए.पी. २०, इंदापूर -युरीया १४१.९७५, डी.ए.पी. १४४ आणि बारामती तालुका युरीया १४९.६२५ आणि डी.ए.पी. १२७ इतका संरक्षित साठा मुक्त करण्यात आला आहे.

जुलै महिन्यामध्ये जिल्ह्यातील पश्चिमेकडील पट्ट्यामधील भात लागवड सुरू असल्याने व जिल्ह्यातील उर्वरित भागात पाऊस सुरू झाल्याने खरीप पेरण्याची कामे चालू असून खताची मागणी वाढत असून त्यादृष्टीने वितरण व्यवस्था करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे

See also  शिरुर उपविभागीय कार्यालयाअंतर्गत सर्व मंडळ स्तरावर ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचे आयोजन