सुसगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होऊ द्या चर्चा “करूया बोल घेवड्या योजनांचा भांडाफोड”कार्यक्रमाचे आयोजन

सुस : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने होऊ दया चर्चा “करुया बोल घेवड्या योजनांचा भांडाफोड” या कार्यक्रमाचे आयोजन श्री भैरवनाथ मंदिर सुसगाव समोरील प्रांगणात करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोथरुड विधानसभा उपशहर संघटीका सौ.ज्योतीताई नितीन चांदेरे व श्री.नितीनभाऊ बाळासाहेब चांदेरे(मा.उपसरपंच सुस,भारतीय विद्यार्थी सेना पुणे जिल्हा सचिव) यांनी केले.


त्या प्रसंगी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देऊन 09 वर्ष वाढवलेली महागाई व जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात हे सरकार अपयशी ठरत आसल्याचा आरोप राम कदम यांनी करत आंदोलन करून शासनाच्या फसव्या योजनाचा भांडाफोड शिवसैनिकांनी केला.


यावेळी बाणेर-सुस- महाळूंगे येथील संतोष मोहोळ उपजिल्हा संघटक,महेश सुतार शिवदूत, संतोष तोंडे विभागप्रमुख, स्वाती रणपिसे विभाग संघतिका, रमेश पारखी शाखा प्रमुख, वसंत चांदेरे शाखा प्रमुख, सुनीता रानवडे शाखा प्रमुख, सुरेखा शेळके शाखा प्रमुख, शालन पाडाळे ,बाळासाहेब काळजे , अमोल फाले, विनोद चांदेरे,विनोद जाधव, पपू माकर,करण चांदेरे, शिवराज चांदेरे, रुपाली शिंदे, छाया चांदेरे,शितल चांदेरे, शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

See also  राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर