महिला सक्षमीकरणासाठी तीन महिलांना ई-पिंक रिक्षांचे वितरण; सुनेत्रा वहिनी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम

पुणे : स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करून, त्यांच्या प्रेरणेतून आणि सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने तीन महिलांना ई-पिंक रिक्षांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराध्यक्ष सुनील आण्णा टिंगरे यांच्या विशेष प्रयत्नांतून हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष वैशालीताई नागवडे, राष्ट्रीय सचिव (क्रीडा व सांस्कृतिक विभाग) अभिषेकदादा बोके, महानगरपालिका गटनेते ॲड. निलेश निकम आणि स्वीकृत नगरसेवक राकेश कामठे यांची प्रमुख उपस्थिती होती.

या उपक्रमांतर्गत सविता केंद्रे, कोमल रावल आणि सोनल शेंडगे या तीन महिलांना ई-पिंक रिक्षांचे वितरण करण्यात आले. या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनविणे, रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.

पुणे शहर युवती कार्याध्यक्षा अमृता रानवडे यांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केले. यावेळी सपना राऊत, शीतल येनपुरे, श्रेया तांबे, वामिका जगताप, निकिता जगताप, श्वेता मिस्त्री, अर्चना वाघमारे, साक्षी खवले, नूतन गायकवाड, बाळासाहेब आहेर, राहुल तांबे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महिलांना रोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्याच्या या उपक्रमामुळे लाभार्थी महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नवी संधी उपलब्ध झाली आहे.

See also  कोथरूड मतदार संघावर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी प्रचाराचा नारळ फोडून कामाला लागला – आमदार सचिन आहिर