पुणे : विधान परिषदेच्या निवडणूक निकालानंतर महायुती मध्ये झालेले वाद वाढवू नका असे आदेश उपमुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना नेत्यांना दिले आहेत .
पुणे पदवीधर मतदार संघात भाजपचा पराभव झाला . भाजप नेत्यांच्या जिव्हारी हा पराभव लागला. शिंदे यांच्या शिवसेनेची मते भाजप उमेदवाराला मिळाली नाहीत असा आक्षेप भाजपने नोंदविला आहे. निवडणूक प्रचार काळात शिवसेना नेत्यांनी पत्रके काढली त्याचा परिणाम निकालावर झाला अशी चर्चा भाजपत आहे.
शिवसेनेचे मंगेश चिवटे यांनी पुणे शिक्षक मतदार संघातून लढण्याची तयारी केली . भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडे घेतला याची नाराजी शिवसेनेत होती.
पदवीधर मतदार संघातील भाजपचे उमेदवार एका वृत्तपत्राशी संबंधित होत्या. त्या वृत्तपत्राने लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात पक्षपाती धोरण स्वीकारले, पेड न्यूज करून दलाल नेमले असे आरोप शिवसेना नेते माजी आमदार रवींद्र धनगेकर यांनी केले होते. निकालानंतरही वाद चालूच राहिले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता सावध पवित्रा घेतला आहे. महायुतीत बिघाड होऊ नये, असे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. यावर भाजपची प्रतिक्रिया काय ते पहावे लागेल.
















