बाणेर येथील पार्वतीबाई धनकुडे अध्यापक महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न

बाणेर : बाणेर येथील भैरवनाथ शिक्षण संस्थेच्या पार्वतीबाई धनकुडे अध्यापक महाविद्यालय बी एड २००६/ २००७ बॅचचा माजी विद्यार्थी मेळावा आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल येथे भैरवनाथ शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवलाल नाना धनकुडे यांच्या अध्यक्षतेखाली हा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला.

यावेळी संस्थापक अध्यक्ष शिवलाल नाना धनकुडे, प्राचार्य चौगुले, प्रा. श्याम रणदिवे, विराज धनकुडे, केदार कदम, अच्युतम घोटेकर, प्राध्यापक दादा पाटील, गौरव बागुल, अरुण वाघ, दत्तप्रसाद कुलकर्णी, प्रवीण ठोंबरे, राजेश खताळे, कृष्णा बोंबे, वर्षा नांगरे, डॉ. गौरी सकुंडे, अभिराज भडकवाड, मोहसीन शेख, शांताराम राणे, फिलिप मुनस्वामी, एम.जी. नवगिरे, सुनील पवार, गोविंद कोंगे , श्रीहरी निकम आदी उपस्थित होते.

यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांनी अध्यापक महाविद्यालयात शिकत असतानाचे अनुभव व्यक्त केले तसेच अनेक विद्यार्थी पार्वतीबाई धनकुडे अध्यापक महाविद्यालयात शिकून आता विविध ठिकाणी मोठ्या हुद्द्यावर नोकरीसाठी कार्यरत आहेत. तसेच अनेक विद्यार्थी आपल्या व्यवसायामध्ये अग्रेसर आहेत या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील शिक्षणामुळे जो अनुभव प्राप्त झाला व त्या अनुभवाच्या जोरावर व शिक्षणाच्या जोरावर आज ते आपल्या आयुष्यामध्ये यशस्वीरित्या जगत आहेत त्याच्या अनुभव विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर व्यक्त केले. यावेळी विद्यार्थ्यांबरोबरच विद्यार्थ्यांना शिकविणाऱ्या शिक्षकांनी देखील त्यांचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर सांगितले.

भैरवनाथ शिक्षण संस्थेचे सचिव विराज धनकुडे यांनी आलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत केले तसेच पुढील आयुष्यात देखील सदैव भैरवनाथ शिक्षण संस्था आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील असे त्यांनी उपस्थित माजी विद्यार्थ्यांना सांगितले.

या मेळाव्यास संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यांमधून महाविद्यालयात शिकलेले विद्यार्थी उपस्थित होते.

See also  सुदानमध्ये अडकलेले 19 महाराष्ट्रीयन नागरिक मायभूमीत परत