शितळादेवी नगर महाळुंगे परिसरात सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी साधला नागरिकांशी संवाद

महाळुंगे : शितळादेवी नगर, महाळुंगे परिसरातील सोसायटीमध्ये औंध बाणेर क्षेत्रिय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. गिरीश दापकेकर यांनी सदर परिसरातील भेट देत नागरिकांच्या समस्या ऐकून घेत समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी एक्विलाईफ होम्स, रॉयल सिरीन, स्क्या बे सोसायटी मधील अनेक रहिवाशी उपस्थित होते, अध्यक्ष श्री. विठ्ठल पडवळ, श्री. अनिरुद्ध काळे, श्री.आदित्य खाडे, श्री. अभिजीत चौगुले, श्री.स्वानंद धोंडसे, श्री. भूषण फुटाणे, श्री.सागर पटेल, श्री. सुधीर सालियन, श्री.रोहित घाटोळ, श्री.अभिजित जोशी, श्री. प्रकाश बोरसे, श्री. अमित जाधव, श्री. धनविजय चौबे, श्री. चेतन पात्रे, श्री. सागर नागाने, श्री आदित्य कवडीकर, श्री.राजीव वायचळ, श्री. पर्वतराव गावंडे, श्री. रौनक पाथरकर, श्री. सुमील मोते, श्री. राहुल लव्हेट, श्री. बाविस्कर, श्री. भावांक गुज्जर सोसायटी मधील जेष्ठ नागरिक महिला आणि पुरुष उपस्थित होते.

सदर परिसरातील रोडवर ची साफ सफाई होत नाही,
बंद अवस्थेत असलेले पथ दिवे येत्या चार दिवसात चालु करण्यात यावेत नियमित रोडवर सांडपाणी येत असल्यामुळे सदर रोड ने प्रवास आणि रोड वरील पाणी थेट सोसायटी पर्यत येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. लाखो रुपयांची सदनिका विकत घेऊन बाहेरून पाहुणे नातेवाईक बोलविणे हि कचरा आणि सांडपाण्यामुळे लाज वाटते असे काही नागरिकांनी समस्या मांडली, मेट्रो मुळे वाकड येथील ब्रिज जवळ नदीचे पाणी अडविल्यामुळे सदर परीसारात डासांचे प्रमाण हि वाढले आहे,
शितळादेवी नगर परिसरात अनेक सोसायट्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या आहे पुणे मनपा कडून कोणत्याही प्रकारचे पाणी दिले जात नाही, शितळादेवी नगर परिसरातील अनियमित मनपाची कचरा गाडी येत असल्यामुळे सदर परिसरातील अनेक सोसायट्याना खाजगी गाडी वर अवलंबून राहावे लागते, मुख्य रोड वर अनेक ठिकाणी बांधकाम साहित्य, गाड्या चे अतिक्रमण केले आहे आदी समस्या नागरिकांनी मांडल्या. यावेळी सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन सहाय्यक क्षेत्रीय आयुक्त गिरीश दापकेकर यांनी दिली.

See also  खडकवासला विधानसभा मतदारसंघात टपाली मतदान प्रक्रियेची प्रभावी अंमलबजावणी