गणपतराव बालवडकर यांचा अभिष्ठचिंतन सोहळा उत्साहात साजरा

बालेवाडी : येथील श्री खंडेराय प्रतिष्ठान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव म्हातोबा बालवडकर यांनी ७ मे रोजी नुकतीच वयाची पंचाहत्तरी पूर्ण केली. त्यानिमित्त अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा श्री खंडेराय प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलाच्या प्रांगणात अतिशय उत्साहात पार पडला .


यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरानी उपस्थित राहून आप्पांचे अभिनंदन केले व भावी दीर्घ व निरोगी आयुष्यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या . यावेळी आप्पांची धान्य तुला करण्यात आली व ते धान्य सामाजिक संस्थेला दान देण्यात आले. तसेच यावेळी आप्पांच्या सदैव सोबत असणाऱ्या त्यांच्या सहचारिणी उषाताई बालवडकर यांचा आप्पा सोबत सपत्नीक सत्कार करण्यात आला .यावेळी उपस्थित सर्वानी दोघांवर पुषवृष्टी केली.


२० जून १९८८ रोजी श्री खंडेराय प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेची स्थापना झाली. या संस्थेला येत्या जून मध्ये ३५ वर्ष पूर्ण होतील. तसेच आज SKP शैक्षणिक संकुलात ८ विविध विद्या शाखा कार्यरत आहेत. आज संस्थेत KG to PG पर्यंत चे उच्च दर्जाचे शिक्षण सर्वांसाठी उपलब्ध आहे .

See also  अंजनाबाई महादेव निम्हण यांचे वृद्धापकाळाने निधन