महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक पद्मविभूषण रतन टाटा यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान

मुंबई : उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक, पद्मविभूषण रतन_टाटा यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर आदी उपस्थित होते.

मीठापासून ते वाहने, विमानांपर्यंत टाटा समूहाच्या उद्योगातून निर्मिती होते. टाटा समुहाने देशासह, जगभरात उद्योग क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. टाटा म्हणजेच विश्वास हे नाते आहे. राज्य शासनातर्फे उद्योग क्षेत्रातील योग्य व्यक्तीला पहिला पुरस्कार देण्यात येत असल्याचा आनंद आहे. या पुरस्काराने पुरस्काराचा मानसन्मान, उंची वाढली आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

See also  भारतीय बाजारात सोन्याला झळाळी. प्रति १० ग्राम ६० हजाराच्या पार.