वंदे मातरम्‌ व राज्यगीताने पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

मुंबई, दि. 27 : विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून मुंबईत प्रारंभ झाला.  विधानसभेत ‘वंदे मातरम्‌’ व ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा,पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्यासह मंत्रिमंडळातील  मंत्री  तसेच विधानसभेचे सदस्य  उपस्थित होते.

See also  महापालिकेने कामांसाठी सीएसआरच्या माध्यमातून उद्योगांचे सहकार्य घ्यावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील