६८ कोटीच्या फसवणुकीप्रकरणी प्रसिध्द बिल्डर व बँकेविरुद्ध गुन्हा दाखल

हडपसर : पुण्यातील हडपसर येथे मगरपट्टा सिटीला लागून असलेल्या सहा एकर जमीन मार्वल सिग्मा होम्स चा मालक विश्वजित सुभाष झंवर याला जमीन मालकांनी विकसनासाठी २०१० साली दिली होती.
सदर व्यवहारामध्ये मार्वल सिग्मा होम्स चा संचालक विश्वजित सुभाष झंवर ह्यांनी सदरचे बांधकाम ३६ महिन्यात पूर्ण करून देण्याचे ठरलेले असतांनाही अद्यापपर्यंत बांधकाम न करता उलट सदरची मिळकत ही जमीन मालकांना अंधारात ठेवून कुठलीही संमती न घेता त्यावर सुमारे ५५ कोटी रुपयाला आयसीआयसीआय प्रुडेन्शियल असेट म्यानेजमेंट कंपनी व विस्तारा आय. टी सी. एल ( पूर्वीचे नाव आय. एल. & एफ. एस ) ह्यांना बेकायदेशीर रित्या गहाण ठेवली. तसेच वेगवेगळ्या खरेदीदारांकडून वेळोवेळी विविध प्रलोभने दाखवून बुकिंग साठी सुमारे १३ कोटी रुपये घेऊन ग्राहकाचीही फसवणूक केली. तसेच जगामालाकांकडून सुद्धा बांधकामासाठी उसने पैसे घेऊन तेही परत न देता सुमारे ६८ कोटी ५० लाख रुपयांची फसवणूक केली आहे. सदर गुन्हा हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेला असून आरोपी विश्वजित सुभाष झंवर अद्यापही फरार आहे.
सदर जागामालक तक्रारदार श्री. निखील प्रमोद मगर वय ३७ ह्यांनी ॲडव्होकेट हेमंत झंझाड व ॲडव्होकेट हेमंत चव्हाण ह्यांचा मदतीने हडपसर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. ह्या प्रकरणी पोलीस आयुक्त रितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार पळसुले ह्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल काळे हे पुढील कार्यवाही करीत आहे.

सदर गुन्हातील आरोपी विश्वजित सुभाष झंवर ह्यांने अश्याच प्रकारे विविध आर्थिक संस्थांशी संगनमत करून पुणे शहरातील अश्याच प्रकारे बरेचशे प्रोजेक्ट अर्धवट स्थितीत ठेऊन बर्याच जगामालाकांची व सदनिकाधारकांची अश्याच प्रकारे फसवणूक केलेली आहे.

See also  गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीच्या बदलाबाबत तात्पुरते आदेश जारी