सोमेश्वरवाडी: जागतिक आरोग्य दिन तसेच भारतीय जनता पार्टीच्या ४५ व्या वर्धापन दिन आणि प्रभू श्रीराम जन्मोत्सवा निमित्त, पाषाण सोमेश्वर वाडी येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि समर्थ युवा फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सोमेश्वर वाडी येथील सोमेश्वर मंदिराचे अध्यक्ष पोपटराव जाधव, तसेच भारतीय जनता पार्टीचे उत्तर मंडलाचे अध्यक्ष सचिन पाषाणकर आणि उपाध्यक्ष सचिन दळवी यांच्या सहकार्याने हे आरोग्य शिबिर यशस्वी झाले.
या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी सौ. वंदना सिंग, सौ. सविता जाधव, सौ. रजनीताई शिरसाट, सौ.सुरेखाताई वाबळे, सौ.रेश्मा घाटे आणि श्री. चंद्रकांत जाधव या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.
या आरोग्य शिबिरात महिलांसाठी मेमोग्राफी चाचणीची सोय मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्यात आली होती, ज्याचा अनेक महिलांनी लाभ घेतला.