पर्यावरण प्रेमींकडून वेताळ टेकडीवरील रस्ता प्रकल्प रद्द करण्याची जोरदार मागणी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस कोथरूड विधानसभा मतदारसंघ आणि युथ कनेक्ट-अर्बन सेलच्या वतीने वेताळ टेकडी ते पौड फाटा या प्रस्तावित प्रकल्प बाबत विचारमंथन करणारे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

या चर्चासत्रात पर्यावरणप्रेमी, तसेच सर्वसामान्य पुणेकर यांना कन्सल्टिंग इंजिनिअर प्रदीप घुमरे यांनी मार्गदर्शन केले. एम आय टी शाळेजवळ असणाऱ्या पुण्याई सभागृह येथे चर्चासत्र संपन्न झाले.

या चर्चासत्राचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेसचे हर्षवर्धन मानकर,गिरीश गुरनानी, स्वप्निल दुधाने यांनी केले होते.

पुणे शहरात वेताळ टेकडी-पौंड फाटा ते बालभारती हा प्रस्तापित रस्ता लवकरच सत्यात उतरवण्याचा पुणे मनपाचा मानस आहे.या प्रकल्पाला विरोध सुरू असताना देखील या प्रकल्पाला कोणतीही स्थगिती दिलेली नाही.

पुणे महापालिकेने अडीचशे कोटी रुपये खर्च करून बालभारती ते पौड फाटा या दरम्यान वेताळ टेकडीवरून नवीन रस्ता आखला आहे. पण या प्रकल्पामुळे वेताळ टेकडीवरील जैवविविधता धोक्यात येत असल्याने त्यास पर्यावरण प्रेमी नागरिकांकडून विरोध होत आहे.

विकासाच्या दिशेने पावले टाकत असताना अनेकदा निसर्ग आणि निसर्गातील अनेक मूक जीवांना पायदळी तुडवले जाते. प्रस्तावित रस्त्याच्या कामामुळे निसर्गसंपन्न असणाऱ्या वेताळ टेकडीला ग्रहण लागेल का, असा प्रश्न पर्यावरणप्रेमींना भेडसावत आहे.

सदर टेकडीवर असणारी जैवविविधता यामुळे धोक्यात येणार असून नैसर्गिक ऑक्सिजन हब नष्ट करून सिमेंट हब उभे करण्याने होणारे दुष्परिणाम आपल्याला भविष्यात भोगावे लागतील , त्यामुळे हा प्रस्ताव रद्द व्हावा अशी मागणी या चर्चासत्राच्या माध्यमातून कन्सल्टिंग इंजिनिअर प्रदीप घुमरे यांनी केली.

या चर्चासत्रामध्ये नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद मांडला या पर्यावरण प्रेमासाठी प्रक्रिया नोंदवताना नागरिकांनी हा प्रकल्प रद्द करण्याच्या मागणीसाठी टाहो फोडला.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल पोटे,नितीन कळमकर,निलेश शिंदे,नवनाथ खिलारे,ज्योती सूर्यवंशी,मोहित बराटे,अनमोल केमसे,किशोर भगत, राजू उभे,शशांक काळभोर,धनंजय पायगुडे,स्वप्नील खवले,समीर उत्तरकर,तेजस बनकर SEED NGO चे पदधिकरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  जलतरण तलावात क्रिकेट खेळून मनसेचे पालिके विरोधात केले हटके आंदोलन