वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपयुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाईची मागणी

पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मुजोर अधिकारी माधव जगताप यांनी दिनांक ४ एप्रिल २०२३ रोजी फर्ग्युसन कॉलेज रोड वाडेश्वर या ठिकाणी स्थित असलेल्या पथरी व्यवसायिकांच्या जेवणाच्या भांड्यांना त्याचबरोबर तेथील वस्तूंना लाथाडून तेथील पथारी व्यवसायिकांवर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर त्याच्या वस्तूंचे नुकसान केले तसेच कारवाई करताना मोठ्या व्यावसायिक जी समोरची अधिक जागा वापरून व्यवसाय करतात परंतु त्यांना जाणीवपुर्वक सुट देणे आणि पथारी व्यवसायिकांवर जाणीवपूर्वक कारवाई करणे अशा प्रकारची दुटप्पी वागणूक देणे अशा प्रकारच्या घटना शहरांमध्ये वारंवार सुरू आहेत. म्हणून सदरच्या घटनेनंतर पथारी व्यावसायिक सुद्धा भयभीत झाले आहेत.
पथारी व्यवसायिकांच्या मनामध्ये अतिक्रमण विभागातील अधिकाऱ्यांबद्दल प्रचंड असंतोष आहे. आणि त्यामध्ये अतिरिक्त उपाआयुक्त अतिक्रमण विभाग माधव जगताप यांनी अश्या प्रकारचे मुजोरी करून अजून त्यामध्ये भर टाकलेली आहे. म्हणून वंचित बहुजन आघाडीने व युवा आघाडीने परखड भूमिका घेतली यामध्ये माधव जगताप यांचे निलंबन व्हावे म्हणून अतिरिक्त आयुक्त विशेष विभाग विलास जी ढाकणे, पुणे महानगरपालिका मुख्य इमारत या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यात आले व तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
तसेच पुणे महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्त्यांनी मुजोर अधिकारी माधव जगताप यांच्या विरोधात घोषणाबाजी केली पक्षाच्या नावाने घोषणाबाजी केली.

यावेळी मुनव्वर कुरेशी अध्यक्ष पुणे शहर, पुणे शहर,प्रफुल्ल गुजर कार्यकारी अध्यक्ष पुणे शहर, एड. अरविंद तायडे महासचिव पुणे शहर, सुनिल धेंडे महासचिव पुणे शहर,विकास भेगडे पाटील उपाध्यक्ष पुणे शहर परेश शिरसिंगे अध्यक्ष युवा आघाडी ,सोमनाथ पानगावे उपाध्यक्ष युवा आघाडी पुणे शहर, शुभम ज्ञानेश्वर चव्हाण महासचिव युवा आघाडी पुणे शहर, अक्षय तायडे सचिव युवा आघाडी पुणे शहर,पी.बी सावळे सचिव पुणे शहर, बाबा वाघमारे संघटक पुणे शहर,रफिक शेख संघटक पुणे शहर, जॉर्ज मदनकर उपाध्यक्ष पुणे शहर,अनिल कुऱ्हाडे व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

See also  पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ, आता ३ ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार – कृषिमंत्री धनंजय मुंडे