हरिलीला सोसायटी येथील ड्रेनेज लाईनची सहाय्यक आयुक्तांनी केली पाहणी मंगळवार पासून काम सुरू करणार

बाणेर. : हरिलीला सोसायटी येथील ड्रेनेज लाईन प्रश्ना बाबत सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांनी पाहणी केली. नव्याने ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 50 लक्ष रुपयांची कामे या परिसरात सुरू करण्यासाठी टेंडर काढण्यात आले.
बालेवाडी फाटा गणपती मंदिरा समोर मुख्य रस्त्यात ड्रेनेज लाईन जीर्ण झाली आहे गेली अनेक महिने येथे ड्रेनेज लाईन फुल्ल होते व ड्रेनेज पाणी रस्त्यावर वाहते, सोसायटी मध्ये साचते रोज याठिकाणी सक्षणव्हॅन लाऊन लाईन साफ करावी लागते. परंतू हा प्रश्न सुटत नाही अशी स्थिती होते कारण लाईन फार वर्षांपूर्वी टाकली होती आणि त्यावेळी लोकसंख्या मर्यादित होती परंतू आता याभागात रहिवासी मोठ्या प्रमाणात वाढले असून हि लाईन पुरेशी नव्हती व जीर्ण झाली होती.

सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या उपस्थिती मध्ये येथे पाहणी करण्यात आली. या कामासाठी 25 लक्ष रुपये प्रमाणे 2 टेंडर प्रक्रिया करण्यात आली आहे असे एकूण 50 लक्ष रुपयाचे काम लावण्यासाठी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर यांनी पाठपुरावा केला होता. मंगळवार पासून सिमेंट रस्ता खोदून हे नवीन लाईन टाकण्यात येणार आहे. हे काम तातडीने पूर्ण करावे अश्या सूचना आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत.

यामुळे रस्त्यावर वाहणाऱ्या ड्रेनेज लाईनच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यास मदत होणार आहे.

See also  बाणेर, बालेवाडी, सूस, महाळुंगे गावातील नागरिकांकरिता डॉ. दिलीप मुरकुटे यांच्या वतीने दिवाळी सरंजाम वाटप