वॉल फिरवून बाणेर बालेवाडी पाणी पुरवठ्याची चाचणी सुरू

बाणेर : गणराज चौक व बालेवाडी येथील २४×७ अंतर्गत कार्यान्वयीत करण्यात आलेला वॅाल्व्ह फिरवुन त्याद्वारे पाणी पुरवठा सुरु करुन बालेवाडी व बाणेर मधील काही भागाची चाचणी सुरु करण्यात आली.
लवकरच पुर्ण क्षमतेने यायोजनेची अंमलबजावणी संपुर्ण बाणेर-बालेवाडी भागामध्ये करण्यात येणार आहे.
गेली अनेक वर्षांपासुन माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती गणेश कळमकर व स्वप्नाली सायकर यांनी पाठपुरावा केला होता.
काही आठवड्यापूर्वी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बालेवाडी परिसरामध्ये सोसायटी यांच्या प्रतिनिधींना एक महिन्यामध्ये कामे पूर्ण करून पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. या पार्श्वभूमीवर बाणेर बालेवाडी परिसरातील भाजपाच्या माजी नगरसेवकांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले होते.
वारजावरून आलेल्या एक्सप्रेस लाईन मुळे बाणेर बालेवाडी येथील पाणी प्रश्न सोडवण्यास मदत झाली असून या पाणीपुरवठ्याची सध्या चाचणी घेण्यात येत आहे.
वॉल सोडून प्रत्यक्षात चाचणी घेण्यात आल्याने बाणेर बालेवाडी परिसरातील पाणी प्रश्न लवकरच सुटणार असल्याचे समाधान यावेळी नागरिकांनी व्यक्त केले.

यावेळी माजी नगरसेवक अमोल बालवडकर, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, भाजपा सहकार आघाडीचे अध्यक्ष प्रकाश बालवडकर, सुंदर बालवडकर पालिकेचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.

See also  जेजुरी येथे खंडेरायाचा सोमवती सोहळा सोमवारी