पत्रकारांचा मुळशी तहसिल कचेरीवर निषेध मोर्चा आंदोलन

बावधन : – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकत्यांनी अमानुषपणे मारहाण करत शिवीगाळ करून धमकी दिली. त्यामुळे पत्रकारांवर केलेल्या हल्ल्याचे कदापि समर्थन केले जाणार नाही. महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुळशी तालुक्यातील सर्व पत्रकारांच्या वतीने तीव्र निषेध करत पौड येथे धडक मोर्चा काढण्यात आला.


यावेळी बोलताना पत्रकार संघ मुळशीचे अध्यक्ष निलेश शेंडे म्हणालेकी, पत्रकार हे लोकशाहीचा चौथास्तंभ असून त्यांच्यावर एका आमदारांच्या कार्यकर्ते कडून मारहाण करण्यात येते हे संविधानाला धरून नसून झालेल्या हल्ल्याबाबत निषेध व्यक्त केला. पत्रकार हा सर्व सामान्य नागरिकाला अडचणीच्या काळात असो अथवा माणूस जन्माला आल्यापासून मरेपर्यंत जीवनातील सर्व घडामोडीवर सविस्तर बातमी द्वारे नागरिकांपर्यंत आपल्या लेखणी द्वारे माहिती पोहचवतो त्यांच्यावर होणारे हल्ले याबाबत शासनाने गंभीर दखल घेत कारवाई करण्यात होणाऱ्या मराहानी बाबत पत्रकार पप्पू कंधारे यांनी निषेध व्यक्त केला. तर पत्रकार यांना होणाऱ्या मारहाणी बाबत कायद्यात तरतूद करण्यात आली आहे.

परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही कायद्याची अंमलबजावणी झाल्यास कोणत्याही राजकीय अथवा गुंड प्रवृती च्या लोकांना वचक बसेल असे मुळशी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विनोद माझीरे यांनी आपल्या कडून याबाबत तीव्र निषेध व्यक्त केला. याबाबत शासनाने गंभीर दखल नाही घेतली तर नागरिकांना एकत्र घेऊन “मुळशी पॅटर्न” पध्दतीने उग्र आंदोलन केले जाईल असा इशारा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष जितेंद्र गोळे यांनी दिला.


मुळशीतील पत्रकारांच्या वतीने तहसिलदार रणजित भोसले आणि पौड वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज कुमार यादव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातून याप्रकरणाची गंभीर दखल घेऊन आमदार व त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्वरित कडक कारवाई करावी. यावेळी पत्रकार निलेश शेंडे, विनोद माझीरे, पप्पू कंधारे, बंडू दातीर, जितेंद्र गोळे, राम गायकवाड, विनायक गुजर, विजय वरघडे, प्रदीप पाटील, प्रविण सातव, राम मानकर, आणि मुळशीतील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

See also  ‘विकसित भारत’ संकल्प यात्रेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ