विजय डाकले यांनी कोथरूड मधून शक्ती प्रदर्शन करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला; सर्वसामान्य कोथरूडरांचा आवाज म्हणून निवडणूक लढवणार -विजय डाकले

कोथरूड : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी
विजय डाकले यांनी सोमवारी सकाळी कोथरूड मतदार संघामध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. विजय डाकले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडे कोथरूड मतदारसंघाची जागा पक्षाने सोडवून घेऊन आपल्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी केली होती, परंतु ही जागा महायुतीत भाजपकडे असल्याने आणि चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्याने डाकले यांनी आज आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरत आपण ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.


त्यामुळे महायुतीमधील पक्षातील पदाधिकाऱ्याने ही भूमिका
घेतल्याने कोथरूड मधील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तपणार असून राजकीय गणीतेही बदलणार आहेत.विजय डाकले यांनी आज शास्त्रीनगर भागातून सकाळी रॅली काढून मोठे शक्ती प्रदर्शन केले. ठिकठिकाणी त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. गुजरात कॉलनी येथे क्रेनव्दारे मोठा पुष्पहार घालून विजय डाकले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्वयंपूर्तीने मतदार नागरिक या रॅलीत सहभागी झाले होते. महिला वर्गही रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. पक्षीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांचा सहभाग नसलेल्या या रॅलीत स्थानिकनागरिकांच्या असलेल्या गर्दीची आज कोथरूड मध्ये चर्चा होती. पक्षाच्या कार्यकर्त्यां व्यतिरिक्त वैयक्तिक जनसंपर्कातून रॅलीला झालेल्या गर्दीतून डाकले यांनी आपली ताकद विरोधकांना दाखवून दिली आहे.

कोथरूड मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी कोथरूड परिसर ढोल ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजी आणि घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला.विजय डाकले यांची उमेदवारी कोथरूडच्या राजकारणात उलथापालथ करणारी ठरू शकते. त्यामुळे पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांची डोकेदुखी वाढणार असल्याचे दिसत आहे.

सर्वसामान्य बहुजन वर्गाचा तसेच कोथरूड मधील सामान्य कोथरूड करांचा आवाज म्हणून मी निवडणूक लढवणार असल्याचे यावेळी बापू डाकले यांनी सांगितले.

See also  व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या ईडब्लूएस,एसईबीसी,ओबीसी मुलींना उच्च शिक्षणाच्या शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये १०० टक्के  सवलत