बावधन : चैतन्य विद्या प्रतिष्ठान च्या पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूलच्या प्रथम बँच च्या सर्व शाखेच्या इ.12 वी च्या विद्यार्थ्यांनी घसघशीत यश प्राप्त करून 100% निकालाचा झेंडा फडकवून सर्वांसमोर आदर्श ठेवला.
सायन्स, कॉमर्स व आर्ट्स या तीनही शाखांच्या विद्यार्थ्यांनी प्रथम वर्षीही आपला अव्वल दर्जा कायम राखून ठेऊन 100% निकालाची 10वी ची परंपरा कायम ठेवली.
सायन्स क्षेत्रातून राज चौधरी याने शाळेतून प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला तर कॉमर्स मधून आदित्य साळुंके याने प्रथम क्रमांक प्राप्त केला असून आर्टस मधून आदिती डिंगणकर हिने प्रथम क्रमांक मिळवून प्रथम बॅच ने 100%निकालाचा लौकिक दाखवून दिला.
पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूल च्या या चढत्या आलेखाचे व
या उत्तुंग यशाचे शिलेदार पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूलस अँड जूनियर कॉलेजेस चे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल सर ,संचालिका सौ रेखा बांदल, सूस शाखेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित , अभिजित टकले पर्यवेक्षिका शुभा कुलकर्णी , सचिन खोडके, माधुरी धावडे या सर्वांनी या निकालासाठी अथ:क परिश्रम घेउन हे १00% निकालाचे अवजड शिवधनुष्य पेलले. यासाठी सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्याच्या अथक प्रयत्नांनी हे यश प्राप्त झाले आहे यात तिळमात्र ही शंका नाही. 100% निकालाच्या या वाट्याचे श्रेय पेरिविंकल समूहाच्या सूस शाखेच्या मुख्याध्यापिका सौ निर्मल पंडित , सर्व पर्यवेक्षक शिक्षकवृंद , विद्यार्थी व पालकवर्ग या सर्वांना जाते असे प्रतिपादन पेरिविंकल इंग्लीश मीडियम स्कूल चे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल यांनी सर्वांचे अभिनंदन करताना केले.