बारामती – पत्रकार स्व.संदिप ज्ञानदेव जगदाळे (पाटील) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ बारामती तालुक्यातील मुर्टी गावात रस्ता लगत (श्री.ज्ञानदेव जगदाळे निवासस्थानी) रविवारी सकाळी ९ वाजता देशी झाडांचे वृक्षारोपण मुर्टी गावचे
सरपंच व ग्रामस्थांच्या हस्ते करण्यात आहे. यावेळी जगदाळे परिवार व ग्रामस्थ उपस्थित होते.
पत्रकार संदीप जगदाळे यांचा मागील दोन वर्षांपूर्वी करोना च्या काळामध्ये दुःखद निधन झाले होते. स्व. संदीप जगदाळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त गावठाण परिसरामध्ये वृक्षारोपण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मागील वर्षीही संदीप जगदाळे यांचे वडील ज्ञानदेव जगदाळे यांच्या पुढाकारातून पस्तीस झाडांचे वृक्षारोपण व ट्री गार्ड लावण्यात आले होते.
मागील वर्षी लावलेली झाडे खुप चांगल्या अवस्थेत वाढली आहेत. या वर्षी देखील मुर्टी गावठाण रस्ता लगत चिंच, स्पॅथोडिया, जांभूळ, सोनचाफा, अशोका इ. वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षारोपण करिता दहा ट्री गार्ड व मोठी दहा झाडे व त्याकरिता लागणारे ड्रीप प्लांट नितीन ज्ञानदेव जगदाळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. सदर वृक्षारोपण उपक्रमात मुर्टी गावाचे सरपंच मंगल खोमणे,उपसरपंच किरण जगदाळे,माधुरी चव्हाण,सुप्रिया तानाजी रा सपुरे, माजी सरपंच, लालासाहेब नालावडे,निरा मार्केट कमिटी संचालक बाळासाहेब जगदाळे, सदस्य कोमल जगताप,
प्रियांका गदादे, मुर्टी विकास सोसायटी चेअरमन नानासाहेब जगदाळे पाटील व जगदाळे कुटुंबीय व मुर्टी ग्रामस्थ उपस्थित होते.