मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स गणेशखिंड येथे यशस्वी रोजगार मेळाव्यामध्ये आयोजन

पुणे : गणेशखिंड येथील मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स येथे टाटा कन्सलटन्सी व प्लेसमेंट सेल ने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यामधे TCS ने विविध पदांसाठी २१ विद्यार्थ्यांची नियुक्ती केली.


या रोजगार मेळाव्यामध्ये B.A., BCom, BCA, Bsc सारख्या विविध शैक्षणिक शाखांमधील 145 विद्यार्थ्यांनी वरील पदांसाठी मुलाखती दिल्या.TCS या कंपनीने त्यांच्या कंपनीच्या आचारसंहिता आणि आवश्यकतांशी जुळवून घेणार्‍या उमेदवारांना ओळखण्यासाठी अनेक मुलाखती फेऱ्यांचा समावेश असलेली कठोर निवड प्रक्रिया आयोजित केली. यात या २१ विद्यार्थ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला.
या सर्वांचे अभिनंदन करताना प्राचार्य डॉ. संजय खरात म्हणाले,” या विद्यार्थांच्या निवडीचा महाविद्यालयाला अभिमान वाटतो. TCS सारख्या कंपनीमध्ये करिअर सुरवात होणे व कौशल्ये दाखवून पुढे जाणे हि एक उत्तम संधी आहे
या रोजगार मेळाव्याचे यश केवळ कंपनी आणि विद्यार्थ्यांची जोडणी एवढेच नसून उद्योग-शैक्षणिक भागीदारी वाढवण्याच्या कॉलेजच्या बांधिलकीला देखील चालना मिळेल”
प्लेसमेंट सेलचे समन्वयक डॉ. सतीश अंबिके यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन सगळ्यांचे आभार मानले. प्लेसमेंट सेलचे सदस्य, प्रा. प्रसाद देशमाने, प्रा. दिपक बोदडे, डॉ. पल्लवी निखारे, प्रा. दीपरत्न खंडारे , प्रा. ज्योती सरवदे, प्रा. प्रेरणा शेर्ला, प्रा. रुतुजा मोकाशे. डॉ.मोनिका जामला यांनी संपुर्ण सहकार्य केले.

कार्यक्रमासाठी सहकार्यवाह प्रा सुरेश तोडकर व उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित यांनी अभिनंदन केले.
हा संपुर्ण कार्यक्रम संस्थेचे कार्याध्यक्ष डाॅ गजानन र. एकबोटे यांच्या मार्गदर्शनामुळे यशस्वी झाला.

See also  जिल्हा विकास आराखडा तयार करण्यासाठी सर्व विभागांनी योगदान द्यावे - जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख