विशाल गांधिले मित्र परिवाराच्या वतीने बंटारा भवन बाणेर येथे निवडणूक नियोजन बैठक

बाणेर : विशाल गांधिले मित्र परीवाराच्या वतीने  बाणेर येथील बंटारा भवन येथे आगामी पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधील विशाल गांधिले यांच्या जवळच्या सहकाऱ्यांची (कोअर कमिटी) नियोजन बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्धार यावेळी सर्व कार्यकर्त्यांनी केला.

बैठकीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बैठकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोरेश्वर बालवडकर, प्रदिप रणपिसे, शैलेंद्र कदम, शिवराज थोरात, नेताजी खैरे, जितेंद्र शर्मा, रूपेश पाडाळे, सागर पाषाणकर, कोंडीबा साळवे, समीर सुतार, महेंद्र पाटील, शिवांजली कळमकर, सार्थक लोंढे, यांनी मार्गदर्शन केले.

या बैठीकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टी च्या उमेदवारांसाठीची यंत्रणा व संपुर्ण निवडणुक व्यवस्थापन कशा पद्धतीने करावे याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला बाणेर – बालेवाडी – सुस – म्हाळुंगे – पाषाण – सुतारवाडी – सोमेश्वरवाडी अशा सर्वच भागातुन विशाल गांधिले यांचे 900 पेक्षा जास्त कार्यकर्ते  व मित्र परीवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

See also  पु. ल. देशपांडे यांच्या 'बिगरी ते मॅट्रिक' कथाकथनाने भारती विद्यापीठात हास्यकल्लोळ