राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचे पुणे म.न.पा. ला नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी एकही झाड न कापण्याचे स्पष्ट आदेश.

पुणे: राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचे पुणे म.न.पा. ला नदीकाठ सुधार प्रकल्पासाठी एकही झाड न कापण्याचे स्पष्ट आदेश दिले.

सारंग यादवाडकर व पुष्कर कुलकर्णी यांनी राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणात दाखल केलेल्या ओरिजिनल अॅप्लिकेशन क्र. ८०/२०२३ मधे आज न्यायाधिकरणाने पुणे म.न.पा. ला खडे बोल सुनावले. “प्रकल्पाच्या मान्यता मिळालेल्या अहवालात नदीकाठी अस्तित्वात असलेली सर्व झाडे राखण्याचे आश्वासन असताना आता झाडे कापण्याचा प्रस्ताव का मांडला?” या न्यायाधिकरणाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर पुणे म.न.पा. चे वकील आणि उपस्थित अधिकारी देऊ शकले नाहीत.
यावर मा. न्यायाधिकरणाने उपस्थितांना फटकारले व एकही झाड न कापण्याचा आदेश केला.

या याचिकेची पुढील तारीख ३१ जुलै २०२३ असून त्यादिवशी पुणे म.न.पा. ने झाडे कापणे/काढणे संदर्भातील सर्व कागदपत्रे, प्राप्त झालेल्या मान्यता आदि माहिती सोबत म.न.पा. ची भूमिका मा.न्यायाधिकरणा पुढे मांडण्याचे आदेश दिले गेले आहेत.

See also  औंध परिहार चौक येथे विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन