पाषाण येथे आयोजित शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत २५०० नागरिकांचा सहभाग

पाषाण : पाषाण येथे आयोजित शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत २५०० नागरिकांना सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन रोहन कोकाटे यांच्यावतीने करण्यात आले होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा मार्गदर्शना खाली हा उपक्रम राबवण्यात आला .सरकारी सेवा आणि लाभ मिळविण्यात नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करून सर्वसामान्यांना विविध शासकीय योजनांचे लाभ मिळावेत त्याचबरोबर विविध महत्त्वाची कागदपत्रेसुद्धा सुलभतेने मिळावीत याउद्देशाने रोहन कोकाटे यांच्या वाढदिवसानिमित्त ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला होता. या उपक्रमाचे उद्घाटन भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. या उपक्रमांतर्गत उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र,अधार कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, संजय गांधी निराधार अनुदान योजना अशा विविध योजना तसेच कार्ड व दाखल्यांचे सुमारे २५०० नागरिकांना वाटप केले.

तसेच शासकीय योजनांच्या बाबतही सविस्तर माहिती घेवून योजनांचा लाभ सर्व लाभार्थ्यांना मिळावा या अनुषंगाने सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

नायब तहसीलदार आखाडे, मंडल आधिकारी सुर्यकांत पाटील, रोहन कोकाटे,भाजपा उपाध्यक्ष राहुल कोकाटे, कोथरूड विधानसभा अध्यक्ष पुनीत जोशी,कोथरूड युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ आदी उपस्थित होते.

See also  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाषाण नगराचे दिवाळी स्नेहमिलन