पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या जिल्ह्यातील पहील्या सचिवालयाचा लोकार्पण सोहळा संपन्न;खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते उद्घाटन


मुळशी : पुणे जिल्ह्यातील बॅंकेच्या पहिल्या सचिवालयाचे उद्घाटन खासदार सुप्रियाताई सुळे यांचे हस्ते पौड ( ता. मुळशी ) येथे करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी बॅंकेचे चेअरमन प्रा.डॅा. दिगंबर दुर्गाडे होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शेतक-यांना सोसायटीच्या कामासाठी तिस-या मजल्यावर चढुन जावे लागत होते. तळमजल्यावर सचिवांसाठी ही मोठी वास्तु झाली. त्यामुळे सचिवांबरोबर शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. वृध्द शेतक-यांना जिने चढण्या उतरण्याच्या त्रासा पासुन यामुळे मुक्ती मिळाली. बॅंकेने हे फार मोठे काम केले आहे.

यावेळी प्रा. डॅा. दिगंबर दुर्गाडे , उपाध्यक्ष सुनील चांदेरे , तालुका अध्यक्ष महादेव कोंढरे, प्रांतीकचे सदस्य राजाभाऊ हगवणे , बॅकेच्या संचालीका निर्मला जागडे , पूजा बुट्टे , अंकुश उभे , रवी जोशी , दूध संघ संचालक कालीदास गोपाळघरे, चंद्रकांत भिंगारे , काका करंजावणे , भगवान नाकती , लहु चव्हाण , प्रा . सविताताई दगडे , स्वातीताई हुलावळे , स्वातीताई ढमाले , जनाबाई ईप्ते , उज्वला पिंगळे , दिपाली कोकरे , उज्वला मारणे, चंदा केदारी , स्वाती वांजळे , मा. सभापती पांडुरंग ओझरकर , मा . उपसभापती विजय केदारी ,दिलीप दगडे, बाळासाहेब बावकर , पी. एम .आर. डी. ए. सदस्य सुखदेव तापकीर , म्. नियोजन समिती सदस्य अमित कंधारे, जितेंद्र इंगवले, निलेश पाडाळे , अनिरूध्द देसाई , सुरेश नांगरे ,राजेंद्र मारणे , तहसिलदार रणजित भोसले साहेब, ए.आर. घुले उपस्थित होते .

बॅंकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविण्यात आला .सुत्रसंचालन घोलप सर यांनी केले. आभार अंकुश उभे यांनी मानले .

See also  काळ्या- पिवळ्या टॅक्सीचा प्रवास महागला; भाडेदरात वाढ