राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत अंजुमन इस्लाम संस्थेचा १५० वा वर्धापन सोहळा संपन्न

मुंबई : सन १८७४ मध्ये स्थापन झालेल्या मुंबईतील अंजुमन- ई – इस्लाम शैक्षणिक संस्थेच्या स्थापनेच्या १५० व्या वर्षाचा उद्घाटन सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

            यावेळी अंजुमन समुहातील विविध संस्थांमध्ये अध्यापन करीत असताना पी.एचडी. प्राप्त करणाऱ्या ५७ अध्यापकांचा तसेच विद्यार्थ्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            अंजुमन संस्थेच्या मुंबई सेन्ट्रल येथील सैफ तय्यबजी मुलींच्या शाळेच्या सभागृहात झालेल्या सत्कार सोहळयाला ‘अंजुमन’चे अध्यक्ष डॉ झहीर काझी, वरिष्ठ उपाध्यक्ष मुश्ताक अंतुले, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. रवींद्र कुलकर्णी तसेच संस्थेचे विश्वस्त प्राचार्य, शिक्षक व माजी विद्यार्थी उपस्थित होते.

See also  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘पीएमयू’च्या बैठकीत राज्यातील विकासप्रकल्पांचा आढावा