बारामती लोकसभा निवडणूकीसाठी भाजपाचे ‘मिशन बारामती’ व्ह्यूवरचना

पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे. या निवडणुकीसाठी भाजपने राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघावर लक्ष ठेवले असून त्यासाठी पदाधिकारीही नेमले आहेत. यातच पुणे जिल्ह्यातील बारामती मतदारसंघावर भाजपचं विशेष लक्ष असून या मतदार संघाची जबाबदारी दौंडचे आमदार राहुल कुल यांच्याकडे देण्यात आली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ काबीज करण्यासाठी भाजपने व्युहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. केंद्रीय मंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे हा मतदारसंघ भाजपने दिला आहे. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी देखील अलिकडेच बारामती दौरे सुरू केले असून त्यांचे सातत्याने या मतदारसंघावर लक्ष आहे.

भाजपचे बारामती लोकसभेचे प्रमुख आमदार राहुल कुल यांनी आज भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे शिवाय प्रत्येक बुथ सक्षम करण्यासाठी कामाला लागण्याचे आवाहनही आमदार राहुल कुल यांनी आज बारामतीत केले. यावेळी त्यांनी बारामती, पुरंदर, दौंड तालुक्यातील भाजप पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

See also  पर्वती विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा