नृसिंह हायस्कूल रक्तदान शिबिरात 50 जणांचे रक्तदान

सांगवी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त नृसिंह हायस्कूल शितोळे नगर सांगवी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन माजी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी 50हून अधिक जणांनी रक्तदानाचे कर्तव्य बजावले.

कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेचे प्राध्यापक क्षितिज कदम, संजय पाटील सर तसेच शाळेचे माजी विद्यार्थी NDRF, CRPF चे जवान अभय येवले यांच्या हस्ते करण्यात आले.

रक्तदान शिबिराचे आयोजन नृसिंह हायस्कूल माजी विद्यार्थी सोशल फाउंडेशन, रक्तपेढी – मथुराबाई वशिष्ठ रक्तपेढी, के. ई. एम. रुग्णालय, पुणे यांनी केले होते.

See also  पिरंगुट येथे महिलांसाठी महारोजगार मेळाव्याचे आयोजन