बालेवाडी येथील खड्ड्यांची स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांसोबत अमोल बलवडकर यांच्याकडून पाहणी

बालेवाडी : बालेवाडी येथे गोल्डन ट्रेलिज, साई कॅनरी रस्त्यावर खड्डे पडुन रहदारीस अडचणी निर्माण होत असल्याबाबत तसेच गोल्डन ट्रेलिज समोर रस्त्यावर माती व चिखल साचल्याबाबत तक्रार येथील रहिवाश्यांनी  केल्या होत्या. यावर तातडीने उपाय-योजना करण्याकरीता संबंधित स्मार्ट सिटीचे अधिकारी, पुणे महानगरपालिका सफाई कर्मचारी यांना सोबत घेवुन माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली.


यावेळी रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजविणे व रस्त्याची सफाई तातडीने करण्याच्या सुचना संबंधित अधिकार्यांना केल्या.
यावेळी परफेक्ट १० व गिनी विविआना सोसायटी समोरील अपुर्ण रस्त्याचे काम देखिल तातडीने सुरु करण्याबाबत सुचना केल्या.
यावेळी  गोल्डन ट्रेलिज, साई कॅनरी व परिसरातील इतर सोसायटीचे नागरीक व स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित होते.

बालेवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामध्ये पाणी साचत असल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. हे रस्ते तातडीने दुरुस्त करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

See also  इंडिया आघाडी सत्तेवर आल्यास निवडणुक रोख्यांचा तपास‌ करू : पृथ्वीराज चव्हाण - निवडणुक रोख्यातून जगातील सर्वात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप