मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित

पुणे : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशान्वये १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे.

पूर्व पुनरिक्षण उपक्रमांतर्गत १ जून २०२३ ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण, प्रमाणिकरण करणे, दुबार, समान नोंदी, एका पेक्षा अधिक नोंदी, तार्किक त्रुटी दूर करणे, आयोगाच्या मानकानुसार छायाचित्र प्राप्त करून मतदार यादीत सुधारणा, विभाग/भाग यांची आवश्यकतेनुसार सुधारणा व मतदान केंद्रांच्या सीमांच्या पुर्नरचना तयार करून मतदान केंद्राच्या यादीला मान्यता आणि तुलनात्मक फरक शोधून फरक दूर करण्यासाठी कालबद्ध योजना आखण्यात येईल. ३० सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित पुरवणी व एकत्रित प्रारुप यादी तयार करण्यात येईल.

एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी १७ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२३ आहे. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या दोन शनिवार आणि रविवारी विशेष मोहिमेअंतर्गत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तर २६ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे व हरकती निकाली काढले जाणार आहेत. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ५ जानेवारी २०२४ रोजी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी दिली आहे.

See also  पुणे आयडॉल' स्पर्धेत गाढवे, बेगमपल्ली, पाठक, पटेकर ठरले विजेते