शरद पवार यांना धमकी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली.

यावेळी सोशल मीडियावर आलेल्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स पोलिस आयुक्तांना देण्यात आली. खासदार सुप्रियाताईंसोबत प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष राखी जाधव, मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो आदींसह पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. राजकारण महाराष्ट्राचे या ट्विटर हँडलवरून पवार यांचा एकेरी उल्लेख करत “लवकरच तुझा दाभोळकर होणार” असे ट्विट करण्यात आले आहे.

याशिवाय सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर अकाऊंटवर ही धमकी दिली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, आता पोलीस नेमकी काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
राजकारण महाराष्ट्राचे या फेसबुक पेजवरून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यावर नर्मदाबाई पटवर्धन असं नाव आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी या फेसबुकवरून देण्यात आली आहे. तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे.

See also  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आळंदी येथे बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण