पुणे : गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालय आणि एच. व्ही देसाई महाविद्यालय यांनी आयोजित केलेल्या इंडियन कौन्सिल ऑफ केमिस्टच्या 43 व्या राष्ट्रीय वार्षिक परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी मुख्य अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रा. सुरेश गोसावी, महाराष्ट्र शासन उच्च शिक्षण अधिकारी डॉ. शैलेंद्र देवळाणकर, डायरेक्टर ऑफ रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ सस्टेनेबल एनर्जी एमेरीटस प्रोफेसर आयआयएसइआर पुणे चे डॉ. सतीशचंद्र ओगले, पीइसो सोसायटीचे बिझनेस कौन्सिल चे चेअरमन डॉ. गजानन एकबोटे, पी ई सोसायटीचे सहकार्यवाह डाॅ जोत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह डाॅ प्रकाश दिक्षित, पूना गुजरात केळवण मंडळाचे चेअरमन श्री. राजेशभाई शहा चोखावला, मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंड चे प्राचार्य डॉ. संजय खरात, एच. व्ही देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र गुरव आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या रसायनशास्त्राच्या माजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. नीलिमा राजूरकर हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना मॉडर्न महाविद्यालय गणेशखिंडचे प्राचार्य डॉ. संजय खरात यांनी केली त्यावेळी ते म्हणाले की, भारतातील मूलभूत संशोधनामध्ये पुण्याचा मोठा वाटा आहे.त्यांनी महाविद्यालयाच्या यशाचा आढावा घेतला.
डॉ. शैलेंद्र देवळाणकर म्हणाले की, महाराष्ट्र राज्यात एकूण 83 विद्यापीठ, 6000 महाविद्यालये आहेत त्यात 4600000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी नॅक ॲक्रीडेशन हे सक्तीचे केलेले महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे.
डॉ. गजानन एकबोटे हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की पी ई सोसायटीची 16 महाविद्यालये आहेत त्यात 65 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मूलभूत विज्ञान विषयांकडे विद्यार्थ्यांचा ओढा कमी होत आहे. त्याचा विज्ञान संशोधनावर विपरित परिणाम होऊन देशपातळीवर संशोधनामधे घट होईल. केंद्रीय, राज्य व महाविद्यालयीन शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६% खर्च होणे अपेक्षित आहे. तो तसा होत नसल्याने याचा परिणाम शिक्षकांच्या नेमणुकांवर होत आहे.
प्रमुख वक्ते डॉ. सतीशचंद्र ओगले हे ऊर्जा आणि शाश्वत विकासावर बोलताना म्हणाले की गाडीची किंवा मोबाईलची बॅटरी ही 10 वर्ष चालते नंतर त्याचा वापर होत नाही परंतु त्यातील इथेनॉल काढून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल या बद्दल त्यांनी विस्तृत चर्चा केली. डॉ. प्रा. सुरेश गोसावी , कुलगुरू सावित्रीबाई फुले विद्यापीठ, म्हणाले एआय,’मशीन लर्निग मॉडेलचा वापर जर रसायनशास्त्रात केला तर विकसित भारतासाठी याचा भरपूर उपयोग होईल. आयसीसी चे अध्यक्ष प्रा. रणजित वर्मा त्यांच्या भाषणात नालंदा विद्यापीठापासून आजपर्यंत शिकवण्यात येणाऱ्या रसायनशास्त्र अभ्यासाचा आढावा घेतला. ते म्हणाले नोबेल पुरस्कार मिळवणारे खूप भारतीय असतील परंतु सी. व्ही. रामन हे संशोधन करून नोबेल मिळवणारे एकमेव भारतीय शास्त्रज्ञ आहेत. यावर्षीपासून राष्ट्रीय स्तरावर पी. सी. रे यांची जयंती साजरी करण्यात येईल असे म्हणाले
नंतर ह्या कार्यक्रमात रसायनक्षेत्रात नवनवीन प्रयोग करणाऱ्या प्राध्यापकांना व संशोधकांना पुरस्कार देण्यात आले यावेळी आयसीसी चे सदस्य उपस्थित होते.
प्रा. डी. अशोक यांना ग्रीन मेडीसिन अँड केमिकल केमिस्ट्री या क्षेत्रात संशोधन केल्याबद्दल लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार देण्यात आला.
त्यानंतर प्रा. देवदत्त चतुर्वेदी यांना प्रा. डब्लू. यू मलिक मेमोरियल पुरस्कार,
प्रा. विनोद तिवारी यांना डॉ. एस. पी. हिरेमठ मेमोरियल पुरस्कार ,
डॉ श्वेता जगदीश मालोडे यांना डॉ. अरविंद कुमार मेमोरिअल पुरस्कार,
प्रा. ब. ब. व. सैलजा यांना प्रा. काझा सोमशेखर राव पुरस्कार,
प्रा. डॉ राजन डे यांना प्रा. एस. टी. नंदीबेवूर पुरस्कार,
प्रा. बाबुराव बी. शेंगटे यांना डॉ. एस एम आय गुप्ता मेमोरियल पुरस्कार,
प्रा. रत्नामाला सुभाष बेंद्रे यांना डॉ. पी एन शर्मा मेमोरियल पुरस्कार देण्यात आले.
या कार्यक्रमाचे सहयोजन डॉ सुषमा काताडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मनीषा माटेगांवकर यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ माधुरी कुलकर्णी यांनी केले. या प्रसंगी डॉ ज्योत्स्ना एकबोटे, प्रा. सुरेश तोडकर, डॉ प्रकाश दीक्षित, पुना गुजराती केळवण मंडळाचे चेअरमन राजेशभाई शहा, एच. व्ही. देसाई महाविद्यालयाचे प्रा. डॉ राजेंद्र गुरव उपस्थित होते.
ही कॉन्फरेन्स पुढील दोन दिवस चालणार असून त्यात दोनशे पेक्षा जास्त पोस्टर व पेपर सादर होणार आहेत. 45 पेक्षा जास्त स्पीकर हे वेगळ्या वेगळ्या विषयांवर बोलणार आहेत. 27 तारखेला दुपारी सोसायटल अँप्लिकेशन ऑफ न्यूक्लिअर सायन्स अँड टेकनॉलॉजी यावर सिम्पोसियम होणार आहे.प्रा. एम के रावत खजिनदार, आयसीसी, प्रा. एस सी गोयल जॉईंट सेक्रेटरी आयसीसी, प्रा. रणजित वर्मा अध्यक्ष आयसीसी, प्रा. राजेश ढाकरे सेक्रेटरी आयसीसी हे उपस्थित होते. परिषदेच्या समारोप प्रसंगी ‘आयसर’चे संचालक डाॅ सुनील भागवत उपस्थित राहणार आहेत.