पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य उपक्रमासाठी प्रकाश बालवडकर यांनी शुभेच्छा पर चेक सुपूर्द केला

कोथरूड : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस हा गरीब गरजू रुग्णांना संजीवनी देणारा असावा यासाठी हार पुष्पगुच्छ भेट वस्तू ऐवजी त्याची रक्कम आरोग्य उपक्रमासाठी देण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आव्हानाला प्रतिसाद देत प्रभारी सहकार आघाडी भा ज पा चे प्रकाश बालवडकर यांनी आपला शुभेच्छा पर मदतीचा चेक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

माजी खासदार कै. गिरीश बापट, माजी आमदार कै.मुक्ता टिळक, माजी आमदार के. लक्ष्मण जगताप या सहकाऱ्यांच्या जाण्याची पार्श्वभूमी चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाला असल्याचे सांगत हा वाढदिवस आरोग्य या विषयाशी संबंधित असावा व यातून गरीब गरजू रुग्णांची मदत व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने जमा होणारी रक्कम रुग्णांच्या मदतीला वापरली जाणार असल्याने या उपक्रमाचे समाजाच्या विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.

See also  लोकसभा सार्वत्रिक निवडणूक पारदर्शी पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षण उपयुक्त ठरेल-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख