“कसबा ब्लॉक कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री.अक्षय प्रकाश माने यांची नियुक्ती जाहीर “


पुणे : पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री अरविंद शिंदे यांनी कसबा ब्लॉक कांग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी श्री अक्षय मानेयांची नियुक्ती जाहीर केली असून कॉंग्रेस भवन येथे त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

याप्रसंगी अजित दरेकर, संगीता तिवारी,शिवराज भोकरे, सुजित यादव, मेहबूब नदाफ, सनी रणदिवे उपस्थित होते तसेच विशेष महत्त्वाचे म्हणजे कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी श्री अक्षय माने यांच्या भावी राजकीय कार्यास शुभेच्छा देवून अभिनंदन केले.श्री. अक्षय माने एन एस यू आय संघटनेपासून प्रदेश युवक काँग्रेस पदावर पक्षाचे अनेक वर्षे काम केले आहे.धर्मवीर संभाजी मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि संयुक्त रविवार गणेश -शिव जयंती उत्सव समिती अध्यक्ष म्हणून काम केले आहे. तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत . श्री अक्षय माने यांनी सर्वांना बरोबर घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करीन असे मनोगत व्यक्त केले.

See also  मल्टिमोडल हबमुळे स्वारगेट चौकाचा कायापालट होणार -मुरलीधर मोहोळ