भारती विद्यापीठात उद्योजकता संवादमालेला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांच्या वतीने तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोन्मेष, संवर्धन व उद्योग-संलग्नता केंद्राच्या सहकार्याने आयोजित ‘उद्योजकता संवादमाले’ची दोन्ही सत्रे उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये नवसंकल्पना, उद्योगाभिमुख दृष्टी आणि स्वावलंबी विचारसरणी विकसित करणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू होता.पहिल्या सत्रासाठी ड्रीमहंट इंडिया यांच्या सहसंस्थापक कु. मनीषा भाटी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव कथन करताना कल्पनेपासून यशस्वी उद्योग उभारण्यापर्यंतचा प्रवास, त्यातील अडथळे, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले.

पहिल्या सत्रासाठी ड्रीमहंट इंडिया यांच्या सहसंस्थापक कु. मनीषा भाटी प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव कथन करताना कल्पनेपासून यशस्वी उद्योग उभारण्यापर्यंतचा प्रवास, त्यातील अडथळे, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचे महत्त्व अधोरेखित केले.

प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी विद्यार्थिनींनी भीती आणि आत्मसंशय यांवर मात करून धाडसाने पुढे जावे, असे आवाहन केले.दुसऱ्या सत्रात एरजेन टेक्नोव्हेशन प्रा. लि. चे सहसंस्थापक व तांत्रिक प्रमुख श्री. नित्यानंद प्रभुतेंडोलकर यांनी तंत्रज्ञानाधारित उद्योगांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

दुसऱ्या सत्रात एरजेन टेक्नोव्हेशन प्रा. लि. चे सहसंस्थापक व तांत्रिक प्रमुख श्री. नित्यानंद प्रभुतेंडोलकर यांनी तंत्रज्ञानाधारित उद्योगांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे डॉ. देविदास गोल्हार यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास उपप्राचार्या डॉ. सुवर्णा चोरगे, उपप्राचार्य डॉ. अविनाश पवार, डॉ. विजया पवार, विभागप्रमुख डॉ. संदीप पाटील तसेच प्रा. विनोद मुळीक आणि सर्व विभागप्रमुख व प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. विद्यार्थी स्वयंसेवक कु. कश्यपी मिस्त्री, कु. गीतांजली देसले आणि कु. प्रणिता माने यांनी आयोजनात सहकार्य केले.

या संवादमालेमुळे विद्यार्थ्यांना नवसंकल्पना प्रत्यक्ष उद्योगात रूपांतरित करण्याची प्रेरणा मिळाली असून भविष्यात अशा उद्योग-शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याचा संस्थेचा मानस आहे.

See also  बालदिन व वाढदिवसानिमित्त कोथरूडमधल्या ५५० बाल मित्रांना शैक्षणिक साहित्य वाटप