राज्यपालांची युद्धनौकेला भेट; पाणबुडीची देखील केली पाहणी

मुंबई : राज्यपाल रमेश बैस यांनी आज भारतीय नौसेनेच्या आयएनएस विशाखापट्टनम या युद्धनौका व आयएनएस वेला या स्कॉर्पियन पाणबुडीला भेट देऊन पाहणी केली.

नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ व्हाईस ॲडमिरल संजय भल्ला व आयएनएस विशाखापट्टनमचे कमान अधिकारी कॅप्टन अशोक राव यांनी राज्यपालांचे स्वागत केले व त्यांना युद्धनौकेची माहिती दिली.

आयएनएस वेलाचे कमोडोर श्रीराम अमूर व कमान अधिकारी मिथिलेश उपाध्याय यांनी राज्यपालांना आयएनएस वेला पाणबुडीची माहिती दिली.

See also  विशाळगड अतिक्रमणांबाबत केवळ दिखाऊपणा करणाऱ्या प्रशासकीय बैठकीवर बहिष्कार : १४ जुलै रोजी शिवभक्त विशाळगडावर जाणारच छत्रपती संभाजी राजे यांचा निर्धार