पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात नवीन मंत्र्यांचा परिचय

मुंबई : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधानसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, तर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नवीन इतर आठ मंत्र्यांचा सभागृहाला परिचय करून दिला.

उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे- पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम, क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांचा यामध्ये समावेश आहे.

See also  महसूल व वनविभागाच्या अखत्यारित किल्ल्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी कार्यवाही हवी -आ.रोहित पवार