मोदींच्या विरोधात विरोधकांच्या आघाडीचे नाव ‘INDIA’ ठरले

बंगळुरू : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची बंगळुरू येथे बैठक सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधातील जवळपास ३० पक्ष एकजूट करण्यात येत आहे. या बैठकीसाठी राज्यातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सिपीआय नेते सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे नेते खा. डेरेक ओ ब्रायन आदी उपस्थित राहिले आहेत.

बंगळुरू येथे सुरू असणाऱ्या विरोधी पक्षांच्या बैठकीत, या आघाडीचं नाव INDIA ठेवण्याचा प्रस्ताव खासदार राहुल गांधी यांनी मांडला. त्यांच्या या कल्पकतेच प्रचंड कौतुक. सर्व पक्षांनी याला अनुमोदन देत आगामी लोकसभा निवडणूक INDIA या नावाखाली लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

I – Indian N – National D – Democratic I – Inclusive A – Alliance Let’s save idea of INDIA. Let’s save Democracy of INDIA असं ट्विट राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

See also  महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे