उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त शिवम सुतार यांच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप

पाषाण : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त माजी स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार यांच्या वतीने पाषाण सुतारवाडी परिसरातील सफाई कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले.

दिवस-रात्र, सर्व ऋतूंमध्ये परिसराच्या स्वच्छतेसाठी राबणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांची काळजी घेणे आपलीही जबाबदारी आहे. त्यामुळे भर पावसात कामाची गैरसोय होऊ नये, यासाठी आपली जबाबदारी ओळखून कर्मचाऱ्यांना रेनकोट वाटप करण्यात आले असे भाजपचे शिवम सुतार यांनी सांगितले.

पावसाळ्यात काम करतानाची गैरसोय दूर झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

See also  मुकुंद नगर येथे १२० बांधकाम कामगारांना इण्डस्ट्रेल साहित्य पेट्या वाटप