भाजपा पुणे शहराध्यक्षपदी धीरज घाटे यांची नियुक्ती

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहराध्यक्ष पदी
महापालिकेतील माजी नगरसेवक धीरज घाटे यांची
नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचा आक्रमक चेहरा
म्हणून घाटे यांची पुणे शहरात ओळख आहे. पुणे
शहरामध्ये अनेक वर्षापासून घाटे भाजप संघटने मध्ये
कार्यरत आहेत.

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील महत्वपूर्ण
दुवा असलेल्या जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करण्यात
आली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी
राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश
कार्यकारिणीशी चर्चा करून ७० संघटनात्मक
जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात केली आहे.

See also  शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याची घोषणा