पुणे – नुकत्याच जाहीर झालेल्या एस.एस.सी. परीक्षेत 97% गुण मिळवून शाळेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या साई श्रीकांत कदम हिचा आणि इतर यशस्वी विद्यार्थ्यांचा बोपोडी ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी साई श्रीकांत कदम हिला माजी आमदार दिप्ती ताई चवधरी यांच्या हस्ते फेटा, शाल, गुलाब पुष्प व शालेय साहित्यांची बॅग देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र भुतडा, शशिकांत पाडुळे, इंद्रजित भालेराव, प्रशांत टेके, कमल गायकवाड, ज्योती परदेशी, मुस्कान शेख, शुभांगी नाईक, विजय सरोदे, संदीप भिसे, उमेश कांबळे, गणेश सारवान, सुभाष निमकर, अंजली दिघे, शोभा आरूडे, वसुधा निर्भीणे, सिल्वराज अँथोनी, राजेंद्र निर्भोणे, चेतन भूतडा इ. मान्यवर उपस्थित होते.
याच कार्यक्रमात आयुष दिघे, किर्तेश देशपांडे, समृद्धी गायकवाड, अनिरुद्ध परदेशी, वैभवी गायकवाड, श्रावणी शेवाळे, प्रगती नाईक, उत्कर्ष ओव्हाळ, अथर्व कांबळे या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.
सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या जिद्द व कष्टाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले असून, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
घर ताज्या बातम्या 97% गुणांसह शाळेत प्रथम आलेल्या साई श्रीकांत कदमसह इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा बोपोडी...